Friday, April 18, 2025
Latest:
गुन्हेगारीपिंपरी चिचंवडविशेष

गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याप्रकरणी परप्रांतीय तरुणास अटक

महाबुलेटीन न्यूज
पिंपरी चिंचवड : विनापरवाना गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याप्रकरणी सांगवी येथे परप्रांतीय तरुणास अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून पिस्टल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सांगवी पोलीस ठाणे हद्दीत स.पो.नि. सतिश कांबळे, पोलीस हवालदार भिसे, पोलीस नाईक भोजने, पोलीस नाईक केंगले, पोलीस नाईक देवकांत असे सांगवी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना सायंकाळी 5.30 वाजनेचे सुमारास पोलीस हवालदार भिसे व पोलीस नाईक देवकांत यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकंडुन स्वराज गार्डन हॉटेलजवळ, स्वराज गार्डन चौक, पिंपळे सौदागर, पुणे याठिकाणी पांढरा रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम गावठी कट्टा घेवुन येणार असल्याचे खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमी स.पो.नि. सतिश कांबळे यांना कळविले असता त्यांनी सदर बातमीचा आशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, सांगवी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना दिल्याने त्यांनी सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

स.पो.नि. सतिश कांबळे, पोलीस हवालदार भिसे, पोलीस नाईक भोजने, पोलीस नाईक केंगले, पोलीस नाईक देवकांत व दोन पंच यांच्यासमवेत खाजगी वाहनाने स्वराज गार्डन हॉटेलजवळ, स्वराज गार्डन चौक, पिंपळे सौदागर, पुणे येथे जावुन बातमीप्रमाणे खात्री केली. 05/45 वाजणेचे सुमारास सदर ठिकाणी जाऊन सापळा रचुन थांबलो असता 08.20 वाजणेचे सुमारास वरील वर्णनाचा एक संशयित इसम दिसला. त्यावेळी त्यास संशय आल्याने तो पळुन जात असताना पोलीस हवालदार मिसे, पोलीस नाईक देवकांत व पोलीस नाईक भोजने यांनी शिताफीने पाठलाग करून त्यास पकडले. दोन पंचासमक्ष सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव कुंचप्पा तिपण्णा गुडुर ( वय ४२ वर्षे, धंदा मजुरी, रा. C/o. उमेश बोडके, मु.पो. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे. मुळ राहणार मु.पो. कामावरम, ता. मंत्रालय, जि. कर्नुल, राज्य आंध्रप्रदेश ) असे असल्याचे सांगितले. त्याची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता कुंचप्पाच्या ताब्यात कंबरेला शर्टाच्या आतील बाजूस एक गावठी पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिश्यात दोन काडतुस मिळुन आले. त्याच्याकडे सदर गावठी पिस्टल व काडतुसांबाबत विचारपुस केली असता त्याने त्याबाबत उडवाउडवीचे उत्तरे देवून त्याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे त्याने विनापरवाना एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुस जवळ बाळगल्याची खात्री झाली. म्हणून दोन पंचासमक्ष त्याच्या ताब्यातील एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसासह ताब्यात घेवुन स.पो.नि. सतिश कांबळे यांनी दोन पंचासमक्ष जागीच सविस्तर पंचनामा केला.

आरोपी नामे कुंचप्पा तिपण्णा गुडुर ( वय ४२ वर्षे, धंदा मजुरी, रा. C/o. उमेश बोडके, मु.पो. गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे. मुळ रा. मु.पो. कामावरम, ता. मंत्रालय, जि. कर्नुल, राज्य आंध्रप्रदेश ) याचे विरुध्द पोलीस नाईक १६७७ शशिकांत देवकांत यांनी तक्रार दिल्याने सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १५७/२०२१ मा.इ.का. कलम ३ (२५) सह महा. पो. अधि. कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, पुणे, रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त पिं.चिं. आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पिंपरी चिंचवड, पुणे, श्रीकांत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिंपरी चिंचवड, पुणे, रंगनाथ उंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे, अजय भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सांगवी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सतिश कांबळे, पो.हवा. चंद्रकांत भिसे, पो.ना. सुरेश भोजने, पो.ना. कैलास केंगले, पो.ना. रोहिदास बोऱ्हाडे, पो.ना. शशिकांत देवकांत, पो.ना. नितीन खोपकर, पो.ना. अरुण नरळे, पो.शि. विजय मोरे, पो.शि. हेमंतकुमार गुत्तीकोंडा, पो.शि. अनिल देवकर, पो.शि. शिमोन चांदेकर यांनी केली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!