गांजाची शेती करणाऱ्या फरार आरोपीला तीन वर्षांनंतर अटक
गांजाची शेती करणाऱ्या फरार आरोपीला तीन वर्षांनंतर अटक
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
जुन्नर दिं ६ : गांजाच्या शेती प्रकरणी जुन्नर पोलीसांनी फरार असलेल्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला तीन वर्षानंतर अटक केली. नामदेव घनकुटे असेअटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक युवराज मोहीते यांनी ही माहीती दीली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन आरोपी फरार होते. जुन्नर पोलीस फरारी आरोपीच्या मागावर होते. तीन वर्षांपुर्वी खेतेपठार या गावात कारवाईत सात लाख रुपये किंमतीचा ७०० किलो गांजा जप्त करण्यात आला होता. यात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. तर दोन आरोपी फरार होते.