बनावट पोलिसास जेव्हा दबंग पोलीस अधिकारीच भेटतो तेव्हा….
महा बुलेटिन न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर. दि २२ :
बनावटगिरी करणाऱ्या तोतया पोलिसास जेव्हा खरा पोलीस भेटतो तेव्हा बनावटगिरी उघडकीस येते. पोलिसी खाक्यासह पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागतो.अटकही व्हावे लागते….हा सारा प्रकार खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. खऱ्या पोलिसांनी बनावटगिरीचा बुरखा फाडला.
खेड पोलिसांनी तोतया जयदीप नवीनकुमार शहा (वय २० अकोले, जि.अहमदनगर , सध्या चाकण,ता. खेड) यास अटक केली आहे पोलिस निरिक्षकअरविंद चौधरी मित्रासह गुळाणीरस्त्यावरील घाटात य गेले होते. झाडाखाली बसले असताना जयदीप नवीनकुमार शहा हा तोतया पोलिस पोलीस वर्दीत तेथे मित्रांसह आला. पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी व त्यांच्या मित्रास तोतया पोलिसाने विचारले, तुम्ही इथे काय करता ? दारू पिता काय? दारू कुठे लपवून ठेवली?
त्यावर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी विचारले की, तु कुठल्या पोलिस ठाण्यात काम करतो, त्यावर त्यांने सांगितले मी चाकण येथे काम करित आहे. दरम्यान चौधरी यांच्या मित्रांनी त्या पोलिसाला सागितले, हे चौधरी साहेब खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आहेत. आता अंगाशी येणार, बनावटगिरी उघड होणार हे लक्षात येताच सॅल्युट मारून तेथुन त्याने पळ काढला.
हा तोतया पोलिस असल्याची शंका चौधरी यांना आल्याने त्यांनी खेड पोलिस ठाण्यात फोन केला.एक तोतया पोलिस खेडच्या दिशेने येत आहे. त्याला ताब्यात घेऊन नक्की पोलिस आहे काय याबाबत चौकशी करा. तात्काळ पोलिस हवालदार तान्हाजी हगवणे, संतोष मोरे, कोमल सोनुमे यांनी मोर्चेबांधणी केली व तोतया पोलिसाला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.