Sunday, October 12, 2025
Latest:
कोरोना

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 1 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे 30 हजार 41 क्विंटल अन्नधान्याची तर 16 हजार 139 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 3 हजार 943 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 30 हजार 371 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात 31 मे 2020 रोजी 95.769 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.094 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
( टिप : – सदरची आकडेवारी दुपारी 12.50 वा.पर्यंतची आहे )

error: Content is protected !!