आश्चर्यकारक व दुःखद बातमी : एकादशीच्या दिवशी भजनात पेटी वाजवताना भाविकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू…पहा लाईव्ह व्हिडीओ…
महाबुलेटीन न्यूज : नासिक जिल्ह्यातील नगरसुल ( ता. येवला ) येथील प्रसिद्ध किराणा दुकानदार बाळकृष्ण लक्ष्मण माळी ( आप्पा – वय 55 ) यांना रविवारी दि. 24 जानेवारी 2021 रोजी पुत्रदा एकादशीच्या दिवशी रात्री साडे नऊच्या दरम्यान मठातील ( चिंचीखाली ) भजनाचा कार्यक्रम चालू होता. यावेळी ते स्वतः पेटी वाजवत असताना त्यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने भजनातच देवाज्ञा झाली. ते लहानपणापासून देवाची सेवा करत होते आणि वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी आळंदी येथील भगूरे गुरुजी यांच्याकडे हट्टाने गायनाचा क्लास लावला होता आणि ते त्यात दंग होऊन शिकत होते.
विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच सांगितलं की, आज भजनाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ काढा आणि त्यात असं घडलं..
खालील व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की पहा माणसाचा जीव जाताना भजनातील सर्वांना प्रत्यक्षात पाहायला मिळाला…
https://www.facebook.com/110412687354527/posts/245300213865773/