एक पाऊल माता भगिनींसाठी उपक्रमांतर्गत गाथा फाउंडेशन व पै. गणेश बोत्रे युथ फौंडेशनच्या वतीने म्हाळुंगे-नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील ५ हजार महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ संपन्न..
● आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : एक पाऊल माता भगिनींसाठी उपक्रमांतर्गत गाथा फाउंडेशन व पै. गणेश बोत्रे युथ फौंडेशन यांच्या वतीने साधून म्हाळुंगे – नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटात संपूर्ण महिनाभर हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला. मकर संक्रांतीला या उपक्रमाचा शुभारंभ करून रथ सप्तमीला बालाजीनगर येथे ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाने उपक्रमाची सांगता झाली.
या समारंभास कान्हेवाडी येथे २५० महिला, सांगुर्डीत ३०० महिला, येलवाडीत ६०० महिला, खालुंब्रे गावात ५०० महिला, महाळुंगे येथे ६०० महिला, खराबवाडीत ७०० महिला, नाणेकरवाडीत ६०० महिला, मेदनकरवाडीत ४०० महिला, कडाचीवाडीत ४०० महिला उपस्थित होत्या. बालाजीनगर येथे १५०० महिलांसाठी गाथा फौडेशन आणि पै. गणेश बोत्रे युथ फौडेशन यांचा वतीने हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला युथ फौंडेशनचे अनेक कार्यकर्ते आणि गाथा फौंडेशनच्या महिला भगिनी आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा कांचनताई ढमाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमास महिला भगिनींकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. एकुण ५००० महिलांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आणि बालाजीनगर येथे कार्यक्रमाची सांगता झाली. आमदार दिलीप मोहिते यांनी गणेश बोत्रे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
—–