दुनिया अनमोल रत्नांची : नितळ निळाई आकाशाची……टँनझेनाईट
नितळ निळाई आकाशाची……टँनझेनाईट.
नमस्कार आज आपण अशा रत्नाबद्दल बोलणार आहोत जे दिवस दुर्मिळ होत चाललेय.अगदी बरोबर टँनझेनाईट या रत्नाबद्दल. निळा रंग लाभलेले टँनझेनाईट हे अतिशय सुंदर रत्न आहे.ज्यांना निळा रंग आवडतो परंतु निलम वापरायची भिती वाटते. परंतू निळ्या रंगाचे एखादे रत्न आपण परिधान करावे असे वाटते अशांनी केवळ हौस म्हणून टँनझेनाईट वापरण्यास हरकत नाही.
जगात टँनझेनाईट केवळ द.आफ्रिकेतील टंझानिया या शहरात मिळतो.या रत्नाच्या खाणी केवळ टंझानिया याच शहरात पहावयास मिळतात. इतरत्र नाही. खुप वर्षापासून मोठ्या प्रमाणात खोदकाम करून उत्पादन वाढविल्याने हा साठा कमी कमी होत चालला आहे.अजून काही वर्षांनी ज्यांच्याकडे हे रत्न असेल त्यांच्या कडेच राहील. अशी अवस्था येईल.आणि म्हणून रत्न प्रेमींनी असं वेगळे पण मोहक रत्न आपल्या संग्रही ठेवण्यास हरकत नाही.या रत्नाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रंग आणि सौंदर्य. पाहताक्षणी खरेदी करण्याचा मोह अनावर होतो. हे रत्न पाहून. ज्योतिषशास्त्रानूसार या रत्नासंदर्भात विषेश माहिती उपलब्ध नाही.युरोपियन संस्कृतीनूसार टँनझेनाईट या रत्नास बर्थस्टोन मानतात.असे अनेक बर्थस्टोन आहेत ज्यांची आपण पुढे माहीती घेणार आहोत.
टँनझेनाईट ओळखावा कसा ? पैलू पाडलेली निळ्या रंगाची काच आणि टँनझेनाईट साधारण सारखाच दिसतो. पण ज्यांना रत्नाची चांगली पारख आहे असे लोक हा फरक अगदी सहज ओळखू शकतात.खुप कमी प्रमाणात निळ्या रंगाचे बुडबुडे या रत्नात पहायला मिळतात परंतू रेषा मात्र अजिबात असत नाहीत या रत्नात.चांगला रत्नपारखीच हा फरक ओळखू शकतो.अगदी सहज आठवले म्हणून सांगतो माझ्या असं निदर्शनास आले आहे की, बऱ्याचदा निलम म्हणून टँनझेनाईट विकला जातो.तोही अगदी हलक्या प्रतीचा. चांगला निळाशार टँनझेनाईट थोडा महाग मिळतो. टँनझेनाईट या रत्नाचे प्रमाणपत्र घ्यावे तेही मान्यताप्राप्त संस्थेचे. स्थानिक संस्थेचे असू नये.म्हणजे आपण आपण खरेदी केलेल्या रत्नाबद्दल आपण १००% संतुष्ट राहतो.
ज्योतिषशास्त्रानूसार अथवा आयुर्वेदात या रत्नाबद्दल फार उपयुक्तता जरी नसली तरी आम्हा व्यावसायिक मंडळींना या रत्नाबाबत विशेष आकर्षण नेहमीच वाटत आले आहे. सौंदर्याचे मुर्तीमंत प्रतिक मानले जाते हे रत्न. टँनझेनाईट सोबत हिरा वापरून कर्णफुले, अंगठी, पेंन्डंट, बांगडी, ब्रेसलेट असे विविध दागिने घडविले जातात.जे फारच मोहक दिसतात. स्त्रिया अशा काँम्बिनेशनचे दागिने आवर्जून खरेदी करतात. हे असे दागिने १८ कँरेटच्या सोन्यात अथवा व्हाईट गोल्डमध्ये बनवलज जातात. असे हे मोहक परंतु दुर्मिळ होत चाललेले रत्न आपल्या संग्रही ठेवण्यास हरकत नाही.
श्री गणेश बेल्हेकर
बेल्हेकर ज्वेलर्स
राजगुरुनगर.
९६५७३२२१०२
९८२२७९९८९८