खा. डॉ. अमोल कोल्हे यांची आणखी एक जनकल्याणकारी मागणी
महाबुलेटिन नेटवर्क
पुणे : महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील नॉन कोविड रुग्णांच्या उपचाराच्या खर्चातच कोविड चाचणीच्या खर्च समविष्ट करण्याची मागणी खा. डॉ अमोल कोल्हे यांनी केली आहे.
कोरोना चा प्रादुर्भाव भारतात सुरू झाल्यापासून या योजनांतर्गत हृदयविकार , किडनी, महिलांची प्रसूती , गर्भाशयाचे आजार यासह विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या नॉन कोविड रुग्णांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.ही चाचणी प्रतिकारकशक्ती तसेच विवध आजार असणाऱ्या लोकांसाठी गरजेची असते या चाचणीचा समावेश महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये करावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
गरीब व जनसामान्य नागरिकांसाठी कोविड चाचणीचे शुक्ल जास्त प्रमाणात असल्याने ते नागरिकांना परवडणारे नसून कोविड सेंटर वर जाऊन चाचणी करणे धोक्याचे आहे.अशी नागरिकांनी डॉ अमोल कोल्हे यांच्याकडे व्यक्त केले यावर त्यांनी दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुणे विभगीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर व जिल्हाधकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवले असून या योजनेमध्ये कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करण्याची मागणी केली.