“डॉक्टर” खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश..
महाबुलेटिन नेटवर्क
पुणे :देशभरात कोविड-१९ चा प्रदुर्भाव वाढत असतानाच जून महिन्यात ग्लेनमार्क कंपनीने fabiflu नावाचे अँटीव्हायरस चे औषध बाजारामध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.हे औषध मधुमेही, उच्चरक्तदाब यांसारख्या रूग्णांवर प्रभावी असल्याचा दावा या कंपनीने केला होता.तसेच या गोळीची किंमत रुपये १०३ नुसार वर्षभरासाठी १२,५०० इतका दर निश्चित केला होता.मात्र हा दर अवास्तव असून गरीब सामान्य नागरिकांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावर खा डॉ अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेत डॉ हर्षवर्धन आणि डीसिजीआय कडे रीतसर पत्र पाठवून या बद्दल तक्रार केली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ खासदार शरद पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कोविड उपाययोजने च्या आढावा बैठकीमध्ये ग्लेनमार्क च्या दाव्यावर आक्षेप घेतला होता.
डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची डीजीआयने दखल घेत अखेर घेत ग्लेनमार्क कंपनीने या गोळीची किंमत प्रति ७५ रुपये इतकी केली आहे. आता १४ दिवसांच्या कोर्स साठी९,१५० रुपये इतका खर्च येणार आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी कोविड १९ च्या वाढत्या धोक्याच्या काळात अशा प्रकारच्या जाहिरात तसेच रुग्णांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला. सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.