दिवाळी सुरक्षित आरोग्याची साहित्य भेट उपक्रम
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
आळंदी देवाची : येथील आळंदी जनकल्याण फाऊंडेशन संचलित श्री मुक्ताई माऊली अन्नछत्रात दिपावली निमित्त आळंदी निवासी साधक वारकरी यांना आरोग्य सुरक्षित दिवाळी उपक्रमात अन्नदानासह अभ्यंगस्नानास साहित्य भेट देण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरीक श्री शिवाजीराव ढमाले यांचे हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष श्री प्रल्हाद भालेकर, सचिव पत्रकार श्री अर्जुन मेदनकर, विश्वस्त व्यवस्थापक श्री गजानन महाराज लाहुडकर, श्री सागर महाराज लाहुडकर, श्री ज्ञानेश्वर घुंडरे पा., उद्योजक श्री सचिन कु-हाडे पा., श्री बुर्डे महाराज, श्री दिनकर तांबे आदी उपस्थित होते.