महाबुलेटीन न्यूज : दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणारा हक्काचा माणूस, सामाजिक कार्यकर्ता, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांनी रस्सीखेच करीत अवघ्या ५ मतांनी विजय खेचून आणला असून खेड तालुक्यातून दिव्यांगासाठी काम करण्याची मेदनकरवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली आहे.
खेड तालुक्यातून सामाजिक क्षेत्रात काम करताना २०२१ च्या स्वराज संस्थेच्या निवडणुकीत दिव्यांग असूनही त्यांनी विजय मिळविला आहे. दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करीत असल्याने सर्व दिव्यांग बांधवाना याचा आनंद झाला असून सभागृहत दिव्यागांचे प्रश्न मांडण्याची संधी मतदार राज्यांनी त्यांना दिली आहे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी ही कामगिरी मागील १० ते १५ वर्षांपासून समर्थपणे पेलली आहे. पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असताना एका पायाने अपंग असूनही त्यांनी दिव्यांगांचे प्रश्न मांडताना अनेक अडचणींना सामोरे जाऊन अहोरात्र दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. याचा दिव्यांग बांधवाना खुप अभिमान वाटत असून आपला हक्काचा एक माणूस आपले प्रश्न मांडण्यासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आवाज उठविणार आहे असे त्यांना वाटते.
पुणे जिल्यातून एकमेव दिव्यांग उमेदवार संजय वाघमारे यांनी मेदनकरवाडी ग्रामपंचायत मध्ये खुप संघर्षातून ५ मतांनी विजय खेचून आणला असून चाकण पंचक्रोशीत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.