संतोष पवार आणि अन्य दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ऊद्या राज्यभर श्रध्दांजली सभांचं आयोजन – एस. एम. देशमुख
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
मुंबई : मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि राज्यातील अन्य 13 दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी राज्यभर उद्या सकाळी अकरा वाजता तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने श्रध्दांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या आज झालेल्या झुम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस तीस जिल्हयातील प्रतिनिधी हजर होते. सर्व प्रथम संतोष पवार यांना परिषदेच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी संतोष बद्दल अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठी पत्रकार परिषदेशी ३५ जिल्हे आणि ३५० तालुका पत्रकार संघ जोडले गेलेले आहेत. अशा सर्व ठिकाणी श्रध्दांजली सभांचे आयोजन करण्यात येईल. हे आयोजन करताना सोशल डिस्टस्टिंगचे पथ्य पाळावे, तसेच स्वतःची काळजी घेऊन हे कार्यक्रम करावेत, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे. या संबंधीचे वृतांत माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावेत, असे आवाहन परिषदेने केले आहे.