Saturday, August 30, 2025
Latest:
गुन्हेगारीपुणे विभाग

देशी बनावटीचे पिस्तल व पाच जिवंत काडतुसासह एका इसमास महाळुंगे एमआयडीसी पोलीसांकडून अटक

महाबुलेटीन न्यूज
महाळुंगे इंगळे :
देशी बनावटीचे पिस्तल व पाच जिवंत काडतुसासह एका इसमास महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी अटक करण्यात आली असून आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनु नकीक अहमद ( वय ३१ वर्षे, रा. सध्याचा पत्ता प्रविण बेंडभर यांचे रुममध्ये भाडयाने, ग्रामपंचायत शेजारी, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे, मुळगाव बहादुरपुर कच्छा, फुलपुर, प्रयागराज, उत्तरप्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक १६/०३/२०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस अंमलदार अमोल माटे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी कल्याण घाडगे व पथकातील पोलीस अंमलदार यांनी व्दारका सिटी समोर, रॉयल चिकन सेंटर जवळ संशयितरित्या थांबलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे ३२,५०० रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे मिळुन आले. सदर इसमाविरुध्द महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. १४९/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) / १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार, चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध्द रित्या शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेकामी सूचना केल्या होत्या. त्यानुसार महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन गिते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष कसबे, सहा. पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस हवालदार राजु राठोड, राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, प्रकाश चाफळे, राजु जाधव, पोलीस नाईक संतोष काळे, सांगळे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!