कोवीड हेल्पसेंटर व्हाटसअप ग्रुप ठरतोय आरोग्यदूत
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
दौंड : ‘कोवीड हेल्पसेंटर आणि प्लाझमा दाता ग्रुप’ दौंडच्या माध्यमातून गेली १ महिन्यापासुन व्हाटसअप वर रुग्णांना मदत होत आहे. यामधे प्रामुख्याने रेमेडीसिवर इंजेक्शन, बेड, रक्त व प्लाझ्मा उपलब्ध करुन देणे व समुपदेशन असे कार्य केले जाते. गेल्या महिन्याभरात ग्रुपच्या माध्यमातून मदत कार्य होत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार हेमंतआप्पा गोडसे नाशिक, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अॕड. राहुल कुल दौंड, आमदार दत्तात्रय सावंत पंढरपूर, राजेंद्र कोंढरे मुख्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य/ राष्ट्रीय सरचिटणीस मराठा महासंघ यांनी शुभेच्छा पत्र पाठवून ग्रुपचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
प्रामुख्याने दौंडचे आमदार अॕड. राहुल कुल यांनी तर निवासस्थानी सर्व टिमला बोलावून कार्याचे कौतुक करुन शुभेच्छापत्र दिले व काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे सांगितले.
यामध्ये प्रामुख्याने हर्षल भटेवरा (राहू), मयुर सोळसकर (कासुर्डी), जयेश ओसवाल (दौंडशहर), सुरज चोरघे यवत, धनराज मासाळ केडगाव, कल्पनाताई काटकर बारामती, नितिन हेंद्रे यवत, प्रकाश वरुडकर यवत, दिनेश गडधे उंडवडी, सचिन गुंड उंडवडी, प्रमोद उबाळे यवत, स्वप्निल घोगरे कानगाव, समीर पठाण नानगाव, प्रसाद मुनोत दौंड, रमेश राठोड दौंड, सौरभ भंडारी दौंड, रोहन सपकाळ लोणी काळभोर, निलेश कुंभार चौफुला, सुरज नेटके हडपसर,
सुहास लोंढे पुणे, निशांत ढोले भोसरी, रोहन होले वानवडी, हरि रोडे चाकण, शिवम घोलप जुन्नर, सचिन तोडकर मंचर सदस्य जोमाने काम करतात.
व्हाटसअप ग्रुपवर आलेल्या मेसेजवर खात्री करुन कार्य केले जाते. सुरुवातीला एकमेकांची ओळख नसणारे एकत्रित येऊन मदतकार्य उभे राहिले. यामध्ये सामाजिक, राजकीय, डॉक्टर, पत्रकार, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही व पुणे जिल्हा मधील इतर रुग्णदूतांचेही सहकार्य लाभत आहे. कोवीड काळ संपला तरी हे कार्य चालूच राहणार आहे, असे ग्रुप सदस्यांचे मत आहे.