Thursday, January 22, 2026
Latest:
आंतरराष्ट्रीयआरोग्यकोरोनापुणेराष्ट्रीयविशेष

मोठी बातमी : कोरोनावरील पहिली लस पुढच्या आठवड्यात येणार….

 

कोरोना लसीला परवानगी देणारा ब्रिटन जगातील पहिला देश..

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : जगभरात अनेक लोक कोरोना लसीकडे डोळे लावून बसले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनावरील जगातील पहिली लस पुढच्या आठवड्यात मिळणार आहे.

ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे.

एकूण १७० स्वयंसेवकांवर लसीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आले होते. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!