कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा रद्द…
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा रद्द…
● या भागात संचारबंदी…
● पोलीस बंदोबस्त तैनात…
महाबुलेटीन न्यूज
घोडेगाव (पुणे) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. या भागात पूर्णपणे संचारबंदी लागू असल्याने गुरुवारी (ता. ११) आणि शुक्रवारी (ता.१२) भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी केले आहे. येथे कडेकोट बंदोबस्तासाठी खेड आणि घोडेगाव पोलिस स्टेशन यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १० पोलिस अधिकारी तसेच १४० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस यांच्या सहाय्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. घोडेगाव पोलिस स्टेशन आणि खेड पोलीस स्टेशन यांनी चोख बंदोबस्तासाठी १० अधिकारी तसेच १४० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. घोडेगाव पोलिस ठाण्याने डिंभे पाँईट, तळेघर, पालखेवाडी, भीमाशंकर एसटी स्टॅण्ड येथील महाद्वार कमान याठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. हे बंदोबस्त टाळून जर भाविक दर्शनासाठी आलेच तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रदीप पवार यांनी दिली.
——–