Monday, October 13, 2025
Latest:
कोरोनाराष्ट्रीयविशेष

आनंदाची बातमी : 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचे वॅक्सीन येण्याची शक्यता…

महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत कोरोनाचे वॅक्सीन येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचे 20 हजाराच्या आसपास रुग्ण दरदिवशी वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता ही दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात आणखी एका वॅक्सीनला ह्युमन ट्रायल ( मानवी चाचणीसाठी ) परवानगी देण्यात आली आहे. देशात 5 दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनाच्या उपचारांसाठी काही औषधे बाजारात आली आहेत, पण उपचारासाठी याची पूर्णपणे हमी दिलेली नाही. अशा परिस्थितीत केवळ कोरोना वॅक्सीनच कोरोनापासून लोकांना वाचवू शकते. ह्युमन ट्रायलनंतर 15 ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते असाही कयास लावला जात आहे. 7 जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
COVAXIN असं या लसीचं नाव असू शकेल असंही सांगण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे वॅक्सीन कसं काम करणार हे 7 जुलैला पहिल्या ह्युमन ट्रायलनंतर कळू शकणार आहे. आतापर्यंत कोरोनावर 125 हून अधिक वॅक्सीनवर काम सुरू आहे. मात्र त्यापैकी भारतात ह्युमन ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!