कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ८ सप्टेंबर २०२० ) खेड तालुक्यात आज ९४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, चाकण शहरात आज सर्वाधिक ४१ रुग्ण वाढले, चाकणमध्ये दोन जणांचा मृत्यू
एकूण रुग्णांची संख्या ४१३७,
३२६९ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ६७, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ८ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ९४ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. चाकण शहरात सर्वाधिक ४१ व आळंदीत २२ रुग्ण आढळले असून चाकण शहरात ५ सप्टेंबरला दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ३२६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ६७, तर ग्रामीण भागात २७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४१३७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ६७ ) : राजगुरूनगर – ४, चाकण – ४१, आळंदी – २२,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २७ ) :
शेलपिंपळगाव – ४
महाळुंगे इंगळे – ३
मेदनकरवाडी – ३,
आंबेठाण, खालुंब्रे, नाणेकरवाडी, केळगाव या ४ गावात प्रत्येकी २ रुग्ण,
चिंबळी, कडाचीवाडी, कुरुळी, शेलगाव, शिंदे, बहुळ, काळुस, मरकळ व वाफगाव या ९ गावात प्रत्येकी १ रुग्ण,
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ९४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४१३७
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ९२
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ७७६
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३२६९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ४१, आळंदी – २२,
# मयत झालेल्या व्यक्ती : ०२ पुरुष ( १ पुरुष – वय ५५, रा. चाकण- घरी निधन, १ महिला – वय ६५, रा. चाकण – नेहरूनगर कोविड सेंटर )