कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ७ सप्टेंबर २०२० ) चिंताजनक : खेड तालुक्यात आज १६५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, तीन जणांचा मृत्यू
कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ७ सप्टेंबर २०२० )
कोरोना रुग्णांचा ४ हजाराचा टप्पा पार,
चांडोली, राजगुरूनगर व नाणेकरवाडी येथील तीन जणांचा मृत्यू,
एकूण रुग्णांची संख्या ४०४३,
३१७५ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ७९, तर ग्रामीण भागात ८६ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ७ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज १६५ नव्याने रुग्ण वाढले असून तालुक्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. तालुक्यात आजपर्यंत ३१७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आज नगरपरिषद क्षेत्रात ७९, तर ग्रामीण भागात ८६ रुग्णांची भर पडली असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४०४३ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ७९ ) :
राजगुरूनगर – २७, चाकण – ३३, आळंदी – १९,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८६ ) :
खराबवाडी ११, म्हाळुंगे ७, मेदनकरवाडी ६, वाकी बुद्रुक ६,
चांडोली ५, आंबेठाण ३, कुरुळी ३, नाणेकरवाडी ३, शिरोली ३, भोसे ३, निघोजे २, कडाचीवाडी २, वाकी खुर्द २, पांगरी २, सातकर स्थळ २, काळुस २, रासे २, तर भांबोली, चिंबळी, शिंदे, वासुली, येलवाडी, कुरकुंडी, होलेवाडी, खरपुडी खुर्द, मलघेवाडी, रोहकल, चऱ्होली खुर्द, चिंचोली, गोलेगाव, केळगाव, मरकळ, शेलपिंपळगाव, वडगाव घेनंद, चास, गोसासी, निमगाव, कोयाळी व खालुंब्रे या २२ गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १६५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४०४३
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ९०
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ७७८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३१७५
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ३३, राजगुरूनगर – २७, आळंदी – १९, खराबवाडी – ११,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०३ पुरुष
तीन रुग्णांचा मृत्यू
————–
तालुक्यात ३० ऑगस्टला राजगुरूनगर येथील ६५ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा स्टार हॉस्पिटलमध्ये, २ सप्टेंबरला चांडोली येथील ६८ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा श्वास हॉस्पिटलमध्ये, तर ५ सप्टेंबरला नाणेकरवाडी येथील ६९ वर्षीय वृद्धाचा पवना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.