कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ३१ ॲागष्ट २०२० ) : चाकणमध्ये आज सर्वाधिक १६ रुग्ण, दोन जणांचा मृत्यू
खेड तालुक्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
तालुक्यात आज ५७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या ३२५४,
नगरपरिषद हद्दीत २३, तर ग्रामीण भागात ३४ रुग्णांची वाढ,
२५४५ रुग्ण बरे होऊन गेले घरी
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ३१ ऑगस्ट ) : खेड तालुक्यात आज नव्याने ५७ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज मोठी घट झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असली तरी तालुक्यात २५४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राजगुरूनगर येथील ६३ वर्षीय स्पर्श हॉस्पिटलमध्ये व शेलपिंपळगाव येथील ६५ वर्षीय जेष्ठाचा वायसीएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नगरपरिषद क्षेत्रात २३ तर ग्रामीण भागात ३४ रुग्णांची भर पडली आहे. आज चाकण सर्वाधिक १६ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीणमध्ये खराबवाडीत ६, तर नाणेकरवाडीत ५ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ३२५४ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २३ ) : राजगुरूनगर – ४, चाकण – १६, आळंदी – ३,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ३४ ) : खराबवाडी ६, नाणेकरवाडी ५, महाळुंगे इंगळे ४, काळुस ३, पिंपळगाव तर्फे चाकण ३, चिंबळी २, येलवाडी २, शेलगाव २, टाकळकरवाडी २, कान्हेवाडी तर्फे चाकण १, खालुंब्रे १, कुरुळी १, निघोजे १, रासे १
# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ५७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या ३२५४
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ७६
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ६३३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – २५४५
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १६,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : २ पुरुष ( वय ६३, राजगुरूनगर व वय ६५, शेलपिंपळगाव )