कोरोना अपडेट खेड तालुका : कोरोना रुग्णांनी केला एक हजाराचा टप्पा पार…
खेड तालुक्यात आज ४२ कोरोना रुग्णांची वाढ
चार महिने निरंक असलेल्या सांगुर्डीत कोरोनाचा प्रवेश, जावई-मुलगी सह कुटुंबातील ५ जणांना संसर्ग, पाच महिन्याचे बाळ निगेटिव्ह,गाव झाले प्रतिबंधित क्षेत्र, औद्योगिक कामगार वर्गामुळे फैलावतोय संसर्ग.
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एका दिवसात नव्याने ४३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १०१७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. आज आळंदी येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा वायसीएम रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सांगुर्डी गावात प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला असून जावई व मुलीसह एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे, तर सुदैवाने त्यांचे पाच महिन्याचे बाळ निगेटिव्ह आहे. औद्योगिक कंपन्यांमध्ये जाणाऱ्या कामगार वर्गामुळे कोरोनाचे संक्रमण होत असल्याचे चित्र दिसत असून कंपन्यांमध्ये वाढणाऱ्या रुग्णांमुळे अनेक कामगार आता कामावर न जाणेच पसंत करीत आहेत.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २० ) : राजगुरूनगर – ९, चाकण – ११, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २२ ) : पाईट १, गुळाणी १, भोसे २, मेदनकरवाडी ३, कुरुळी ४, चिंबळी १, सांगुर्डी ५, सातकरस्थळ ३, कोहिंडे १, वाडा १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ४२
# आजपर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या १०१७ झाली आहे.
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४४३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ५५६
# आज मयत झालेली व्यक्ती : १ ( वय ५६, आळंदी )