कोरोनामुळे भीमाशंकर श्रावण यात्रा रद्द
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
भीमाशंकर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान श्रावण यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
यासंदर्भात गेल्या आठवड्यात सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती तरी सर्व नागरिक व भाविकांनी घरूनच देवाचे नामस्मरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.