कोरोनाग्रस्तांना मायेची ऊब, वाढदिवसाचा खर्च टाळून चिमुकलीचा कोविड सेंटरला १०० ब्लॅंकेट्सच्या मदतीचा हात
महाबुलेटीन नेटवर्क : हनुमंत देवकर
चाकण : कडाचीवाडी गावचे उद्योजक पांडूरंगशेठ लष्करे यांची नात व युवा उद्योजक संदिप पांडूरंग लष्करे यांनी आपली चिमुकली लेक कु. अराध्या हिचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन चाकण एमआयडीसीतील महाळूंगे इंगळे ( ता. खेड ) येथील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी मायेची उब मिळावी, म्हणून १०० ब्लेंकेटची भरघोस मदत करून माणुसकी व संवेदनशीलता जिवंत असल्याचे दाखवून दिले.
एका लहान मुलीने स्वतःच्या वाढदिवशी केलेली छोटीशी मदत कोरोनाग्रस्तांना बळ देणारी आहे. अराध्याला विचारलं की बाळा, तू हे कुणासाठी देत आहेस व का देत आहेस? तर ती म्हणाली, “मी टीव्हीवर कोरोनाग्रस्त माणसांच्या व्यथा पाहिली, म्हणून त्यांच्यासाठी ही मदत देत आहे.”
तलाठी शाम वाल्हेकर वालेकर, ग्रामसेवक निलिमा जाधव व शिवस्वराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष दत्ताशेठ खांडेभराड व सुनिल कड यांच्याकडे ही मदत सुपूर्द केली. या वेळी लष्करे यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. तलाठी शाम वालेकर यांनी या चिमुकलीला शुभेच्छा देताना म्हणाले की, “अराध्या खुप मोठी हो बेटा! तुझी स्वप्ने खुप मोठी आहेत. त्यांना बळ देण्यासाठी आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.”
सामाजिक भान ठेवून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याऱ्या आराध्याला महाबुलेटीनच्या लाख लाख शुभेच्छा.