Sunday, April 20, 2025
Latest:
पुणे

कंटेनर चालकाने ४८ लाखांचा माल केला लंपास; कंटेनरचालकावर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाकण : अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल व इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करीत असताना त्यातील तब्बल ४८ लाख रुपयांच्या महागड्या वस्तू लंपास केल्याप्रकरणी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १२ मार्च ते १४ मार्च या कालावधीत बंगळुरू ते आंबेठाण, पुणे या मार्गावर घडला. याप्रकरणी अनुज सचिव तिवारी (वय २५, रा. वाघोली) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाहिद इलियास (वय २५, रा. राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सेंच्युरी कार्गो कॅरिअर ट्रान्सपोर्ट फर्ममध्ये आरोपी हा कंटेनरचालक म्हणून काम करीत होता. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याने बंगळुरू येथून अमेझॉन कंपनीचे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण १ कोटी ५३ लाख ९३ हजार ३०० रुपयांचा माल भरला. मात्र, आंबेठाण येथे आले असता त्यातील ४८ लाख ६९ हजार ९५३ रुपयांचा माल गायब झाला होता. यावरून कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!