सी एन एच कंपनीमध्ये कामगारांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग पुणेचे अतिरिक्त संचालक विजय यादव यांचे हस्ते उदघाटन.
सी एन एच कंपनीमध्ये कामगारांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग पुणेचे अतिरिक्त संचालक विजय यादव यांचे हस्ते उदघाटन…
महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : कोरोना काळामध्ये आवश्यक सेवा सुविधा पुरवणाऱ्या उद्योगांना उत्पादन प्रक्रिया चालू ठेवण्याची मुभा शासनाने दिली होती आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सदर कारखाने चालू होते. याचाच भाग म्हणून सी एन एच कंपनीने सर्व कामगारांना मोफत कोरोना लसीकरण अभियान राबवण्यात आले आणि या कार्यक्रमाचे उदघाटन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग पुणेचे अतिरिक्त संचालक विजय यादव यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री यादव यांनी सी एन एच कंपनीने कोरोना काळात राबवलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला आणि केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले. कोरोना काळामध्ये कंपनीने सर्व कामगारांची वेळोवेळी कोरोना टेस्ट करून घेणे, मास्क आणि सानिटीझर चे वाटप, कारखान्याची नियमित स्वच्छता अश्या अनेक उपाय योजना कंपनीच्या वतीने राबवण्यात आल्याचं परंतु सामाजिक बांधिलकीची जान ठेवत चाकण एम आय डी सी पोलीस स्टेशन आणि एन डी आर एफ यांना दोन हजार मास्क आणि पाचशे सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात श्री यादव यांचे प्लांट हेड किशोर देवळे यांनी स्वागत केले; तर मानव संसाधन विभाग प्रमुख शीतल साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास कंपनीचे सुरक्षा अधिकारी सुधाकर पाटील, माधव कुलकर्णी व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शैलेश जाधव, प्रशांत बेलवटे, अमित कणसे, रिया गदिया, आकाश पिंजण यांनी मोलाचे सहकार्य केले; तर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कंपनीचे संपर्क विभाग प्रमुख शंकर साळुंखे हे उपस्थित होते.
००००