Wednesday, April 16, 2025
Latest:
खेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविधायकविशेषसामाजिक

चिंतामणी प्रतिष्ठान चाकण आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चिंतामणी प्रतिष्ठान चाकण आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : जात, पंथ, धर्म, पक्ष, हुद्दे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून चिंतामणी प्रतिष्ठान व पुना सिरोलॉजिकल ब्लड सेंटर आयोजित रक्तदान शिबिरास चाकणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले.

चाकणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विक्रम गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. यामध्ये एकूण 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व एक झाड भेट देण्यात आले. यामध्ये ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ आणि ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेशही देण्यात आला. शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी चिंतामणी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आकाश जाधव, अश्विन पिंगळे, भावेश गवांदे, प्रशांत पाटील, बसवराज पाटील, विशाल गोरे, मोहन कोकाटे, शुभम मोरे, रोहित जाधव, श्रीकांत गोरे, गणेश भंडारी, समाधान वाघ, ऋषिकेश गोरे, मंगेश घोंगे, संजय पाटील, योगेश ठाकरे, गणेश आरोटे, प्रीतम रामाने, स्वप्नील सोनवणे, योगेश शिंदे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.


००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!