Saturday, August 30, 2025
Latest:
पुणे जिल्हापुणे शहर विभागमहाराष्ट्रराष्ट्रीयविशेष

चीनमधील ‘हा’ विषाणूही भारतात पसरू शकतो

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : भारतात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असतानाच इंडियन काऊन्सील ऑफ मेडीकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधकांना आणखीन एका विषाणूचा शोध लागला आहे. या विषाणूचे नाव कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) असे आहे. या विषाणूचाही देशात मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आयसीएमआरच्या संशोधकांना ८८३ नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये सीक्यूव्हीच्या अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. या नवीन संशोधनासंदर्भातील वृत्त लाइव्ह मींटने दिले आहे.

अ‍ॅन्थ्रोपॉड प्रकारच्या या विषाणूचा डुक्कर तसेच डासांच्या माध्यमातून संसर्ग होतो. यापूर्वी चीन आणि व्हिएतनाममध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. संशोधकांना ८८३ नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये सीक्यूव्हीच्या अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. आणखीन संशोधन केले असता या दोन्ही रुग्णांना यापूर्वी कधी ना कधी सीक्यूव्हीचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहे. २०१४ आणि २०१७ च्या कालावधीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये अ‍ॅण्टी-सीक्यूव्ही आयजीजी अ‍ॅण्टीबॉडीज आढळून आल्या.

लाइव्ह मींटने आयसीएमच्या शास्त्रज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णांना डुक्कर किंवा जंगलातील पक्षांच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मानवामध्ये आढळून आलेल्या अ‍ॅण्टी-सीक्यूव्ही आयजीजी अ‍ॅण्टीबॉडीज आणि डासांमध्ये आढललेल्या सीक्यूव्ही विषाणूंमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळेच आता संशोधकांनी सीक्यूव्हीची चाचणी करण्यासाठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल पद्धतीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूंचा संसर्ग ज्या डासांच्या माध्यमांमधून होतो त्यांचीही चाचणी करण्यास संशोधकांनी सुरुवात केली आहे. या विषाणूचा भारतामधील डासांवर कसा परिणाम होतो यावर सध्या संशोधन सुरु आहे. डासांच्या माध्यमातून या विषाणूंचा संसर्ग होतो. त्याचप्रमाणे पक्षांमधूनही या विषाणूचा संसर्ग होतो असेही सांगितले जात असले तरी त्याचा ठोस पुरावा अध्याप उपलब्ध नाहीत. पाळलेल्या डुक्करांमध्येही हा विषाणू आढळून आल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!