चास कमान धरण १०० टक्के भरले, भिमा नदी पात्राच्या दुतर्फा गावांना सतर्कतेचा इशारा !
चास कमान धरण १०० टक्के भरले
भिमा नदी पात्राच्या दुतर्फा गावांना सतर्कतेचा इशारा !

महाबुलेटीन न्युज : प्रतिनिधी
राजगुरुनगर : भारतीय व महाराष्ट्र राज्य हवामान विभाग यांनी पुढील ४ / ५ दिवस माेठ्या प्रमाणात पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. चासकमान धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात रिमझीम पावसास सुरूवात झालेली असुन यापूर्वीच धरण १०० % भरले आहे. जर पावसाचे प्रमाण वाढले तर धरणातुन केव्हाही पाण्याचा विसर्ग नदी पात्रात साेडावा लागेल.
त्यामुळे भीमा नदी तीरावरील सर्व गावातील, शहरातील नागरीकांनी सतर्क रहावे. नदी तीराजवळील आपली वाहने, विद्युत पंम्प्स व इतर साधनसामुग्री सुरक्षित ठिकाणी हलवण्याची दक्षता घेण्यात यावी, जेणे करुन कुठल्याही प्रकारची हानी हाेणार नाही. जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.

