चक्री ज्ञानेश्वरी पारायण उपक्रमाची आळंदीत हरिनाम गजरात महासांगता… श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने भव्य सत्कार, कीर्तन, मिरवणूक
चक्री ज्ञानेश्वरी पारायण उपक्रमाची आळंदीत हरिनाम गजरात महासांगता…
श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने भव्य सत्कार, कीर्तन, मिरवणूक
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती व ७२६ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून २३४ ज्ञानेश्वरी चक्री पारायण घरोघरी करीत संत साहित्य आणि विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी व महंत हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या संकल्पनेतून वर्षभर राज्यातील विविध गावोगावी जाऊन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या नवव्या आणि बाराव्या अध्यायाचे सामूहिक पारायण, कीर्तन सेवा, हरिपाठ वाचन व प्रदान सेवा उपक्रम राबविण्यात आला. ग्रंथ दिंडी, नगर प्रदक्षिणा, हभप चैतन्य महाराज देगलुरकर यांचे काल्याचे कीर्तन, अमृतानुभव पुस्तकाचे प्रकाशन, महाप्रसाद होऊन या उपक्रमाची हरिनाम गजरात सांगता झाली.
यावेळी ज्या १०८ ठिकाणी कीर्तन सेवा, महाप्रसाद उपक्रम राबवला, अशा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा आणि प्रसार करणाऱ्यांना माऊलींच्या चांदीच्या चलपादुका देऊन सन्मानित करण्यात आले. वर्षभर ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग अभंग, भाऊसाहेब शिंदे, हभप. शांतीब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर, ह.भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर, हभप. विष्णू महाराज चक्रांकीत, डॉ. नारायण महाराज जाधव, हभप. योगिराज महाराज गोसावी, हभप. पुरुषोत्तम महाराज पाटील, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, भागवत महाराज साळुंखे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, आळंदी संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहीते, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पा., संस्थापक श्रीधर सरनाईक, समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, अनिल कुऱ्हाडे, डॉ. दिपक पाटील, नरहरी महाराज चौधरी, हभप. बाजीराव महाराज चंदिले, हभप. प्रभुराज महाराज पाटील, चरित्र समितीचे पदाधिकारी व माऊली भक्त उपस्थित होते. या अंतर्गत नेवासा मंदिरात शिवाजी महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले.
दरम्यान, यावेळी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीच्या १ ते १८ अध्यायांवर आधारित प्रथम ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात ८६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी, १६ जणांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. दत्तात्रय भिमराव बोरकर (आळंदी), बालाजी नरसिंग शेंडगे (लातूर), दिपक नवनाथ शिंदे (आळंदी), जगदीश यमाजी हांडे (औरंगाबाद), ओंकार विलास दुडे (आळंदी), पुंडलिक वसंत जाधव (आळंदी), सोमनाथ हनुमान मोरे (बीड), ज्ञानदेव आनंदराव ढेकळे (औरंगाबाद), दिपक आधार पाटील (मुक्ताईनगर), सखाराम राधाकिसन पितळे (आळंदी), राजलक्ष्मी राजेंद्र झामरे (आळंदी), डाॅ. शेखर शामराव देशमुख (परभणी), आकाश उद्धवराव सोनवणे (आळंदी), अजय शंकरराव खैरनार (औरंगाबाद), राजाराम आसाराम काटे (आळंदी), आसाराम विष्णु आव्हाड (आळंदी) या गुणवंतांना ज्ञानेश्वरी, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ऑनलाईन परीक्षा उपक्रमासाठी राजेश किराड, भारती पवार, नरसिंह पांचाळ यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रकाश काळे, संस्थापक श्रीधर सरनाईक, नरहरी महाराज चौधरी, विश्वंभर पाटील, विलास वाघमारे, माऊली विर, ज्ञानेश्वर जाधव, पुरुषोत्तम महाराज पाटील यांचेसह समितीचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. भारती पवार यांचे तर्फे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आले. राजेश किराड यांचे वतीने ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ यांचे वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी डॉ. योगेश्वरी भट लिखित अभंग नामस्मरणाचा अमृतानुभव या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. महाप्रसाद वाटपाने या २३४ चक्री ज्ञानेश्वरी पारायण उपक्रमाची हरिनाम गजरात महासांगता झाली.
००००