Sunday, August 31, 2025
Latest:
महाराष्ट्र

चाकण एमआयडीसीत औद्योगिक सुरक्षा पंधरवड्यानिमित्त जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर
चाकण :
चाकण एमआयडीसीतील हॉटेल कोर्टयार्ड मेरिएट येथे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर विभाग महाराष्ट्र शासन व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक सुरक्षा पंधरवड्यानिमित्त अपघात कमी करण्यासाठी किंवा अपघात होऊच नये यासाठी तसेच औद्योगिक इलेक्ट्रिकल सुरक्षिततेसाठी व इलेक्ट्रिकल अपघात कमी करण्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर एन. जी. सूर्यवंशी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे डायरेक्टर मनोज बंसल, सचिव दिलीप बटवाल, स्वीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर ईशान शहाडे, चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे इलेक्ट्रिकल विभागाचे व इतर विभागाचे एकूण १०० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत एन. जी. सूर्यवंशी यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने इलेक्ट्रिकल सेफ्टी ठेवण्यासाठी इलेक्ट्रिकल उपकरने कशी हाताळावीत, इलेक्ट्रिकल अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याविषयी सखोल माहिती देऊन जाणीव जागृती केली. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल अपघात होऊ नयेत म्हणून काय काय पूर्वतयारी करावी, काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली.

मनोज बंसल यांनी इलेक्ट्रिसिटी बिल कसे वाचावे, इलेक्ट्रिसिटी बिल कसे कमी करावे ज्यायोगे वैयक्तिक फायद्याबरोबर देशही हितही कसे साधावे याविषयी माहिती दिली.

ईशान शहाडे यांनी इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्यासाठी व इलेक्ट्रिसिटीचा इफेक्टिव वापर करण्यासाठी, इलेक्ट्रिसिटी वाया जाऊ नये म्हणून व त्याच बरोबर सोलर पॉवर या विषयावर सखोल माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व कंपन्यांचे प्रतिनिधींचे शंकांचे निरसन करण्यात आले. दिलीप बटवाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!