चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे कोरोना पॉझिटिव्ह
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : येथील नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे
ह्यांची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे. मागील काही दिवसांत त्यांनी कोरोना योद्धा म्हणून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
गरजू लोकांना अन्नधान्य, किराणा किट, सॅनिटायझर, मास्क वाटप आदी सामाजिक उपक्रम त्यांनी नगरसेवकांना सोबत घेऊन राबविले असताना त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. काही जवळचे सार्वजनिक कार्यक्रम केले होते. त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व मित्र परिवाराने आपल्या टेस्ट करून घ्याव्यात तसेच सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी महाबुलेटीन न्यूजशी बोलताना केले आहे.