चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी व तलाठी शामराव वालेकर यांच्यासह खेड महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव… महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव.. पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी व तलाठी शामराव वालेकर यांच्यासह खेड महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव…
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव..
पारदर्शक, तत्पर सेवा उपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचवण्यासाठी कार्यरत रहा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड महसूल विभागातील नायब तहसीलदार संजय शिंदे, प्रांत ऑफिसचे अव्व्ल कारकून अविनाश कुलकर्णी, लिपिकमेघा वाव्हळ, चाकण मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, चाकणचे तलाठी शामराव वालेकर व वाड्याचे कोतवाल नितीन कदम यांनामहसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करून सन्मानित करण्यात आले.
“महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवाउपलब्ध करुन शासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी महसूल अधिकारी–कर्मचाऱ्यांनी सदैव प्रयत्नशील रहावे,” असे आवाहन जिल्हाधिकारीडॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारीयांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मतखराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. विजयसिंह देशमुख म्हणाले, “नागरिक महसूल विभागाकडे शासन या भावनेने बघतात. नागरिकांचे वाद, तंटेमिटविण्यसाठी महसूल विभाग काम करीत असतो. त्यामुळे महसूल अधिकारी–कर्मचाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. नागरिकांचाविश्वास संपादन करण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे. शासनाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेल्या सेवांमध्ये सातत्य ठेवावे,” असेहीते म्हणाले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिम्मत खराडे म्हणाले, “अतिवृष्टी, पूरस्थिती अशा विविध आपत्कालिन परिस्थतीत नागरिकांना दिलासादेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करतात. सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचेकार्य करतात.” पुरस्कारार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
0000