चाकण येथील के.बी.पी. महाविद्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न…..
चाकण येथील के.बी.पी. महाविद्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न…..
महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
चाकण, दि. ३ जुलै : येथील नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कै. भागूबाई पिंगळे कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय आणि संजिवनी रक्तपेढी भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि.२ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राज्यात वाढत्या कोरोनामुळे रक्त पुरवठ्याची कमतरता असल्याने राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबीराला महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरघोस प्रतिसाद दिला. याप्रसंगी नवसह्याद्री चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पिंगळे, सचिव शितल टिळेकर, संचालक संदेश टिळेकर, य.च.म.मु. विद्यापीठाचे पुणे विभागप्रमुख उत्तम जाधव, प्राचार्य डॉ. शोभा इंगवले, उपप्राचार्य प्रा. संतोष बुट्टे, रासेयो समन्वयक प्रा. भरत बिरंगळ, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर दुधवडे आदी उपस्थित होते.
===========