Saturday, August 30, 2025
Latest:
अहमदनगरखेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकविशेष

चाकण येथील कार मधील 12 लाख रुपयांची रोकड लंपास करणारे आरोपी गजाआड, चाकण पोलिसांची कामगिरी

चाकण येथील कार मधील 12 लाख रुपयांची रोकड लंपास करणारे आरोपी गजाआड, चाकण पोलिसांची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज
चाकण : गाडीला कट का मारला? असे म्हणून तीन इसमांनी कार चालकाला अडविले व बोलण्यात गुंतवून त्यामधील एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास चाकण येथीक तळेगाव चौका नजीक घडली होती. याप्रकरणी चाकण पोलिसांनी वाहनचालकासह तीन जणांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर येथील के. के. थोरात या कंपनीचे लेखापाल राजु रावसाहेब बोराडे ( वय ३७ वर्षे ) व ड्रायव्हर सुरेश दादु गायकवाड ( वय ३२ वर्षे, दोन्ही रा. संगमनेर ) हे वेनु कार ( नं. एम एच १७ बी एक्स ७५७६ ) मधून कंपनीचे कामगारांचे पगाराचे १२,००,०००/- रु. देण्यासाठी संगमनेर येथुन पुणे येथे जात असताना ०८/३५ वा. चे सुमारास चाकण येथील तळेगाव चौकात कारचे पाठीमागुन येणा-या मोटार सायकल वरील दोन अनोळखी इसमांनी सदर कारने आमचे मोटार सायकलला कट का मारला? अशी विचारणा करत कारमधील लेखापाल व चालक यांचेशी वाद घातला. त्याच दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने कारचे उघडे काचेमधुन आत हात घालून १२,००,०००/- रु. चोरी करून नेले होते. त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं ९५९/२०२१ भादवि कलम ३७९, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

राजू रावसाहेब बो-हाडे (वय 37, रा. करुले, ता. संगमनेर, अहमदनगर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात  चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तद्वनंतर चाकण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सदर गुन्हयातील मोटार सायकल वरील अनोळखी व्यक्तीचा तपास करण्यासाठी सदर गुन्हयाचे घटनास्थळ परीसरातील तसेच नाशिक-पुणे हायवे रोडवरील सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली. तसेच सदर गुन्हयातील वेनु कार ( क्रमांक एम एच १७ बी एक्स ७५७६ )  चालक सुरेश गायकवाड याचे गुन्हयाचे पुर्वीच्या हालचालींची पडताळणी करून व तांत्रीक तपास करून सहायक पोलीस निरिक्षक विक्रम गायकवाड, पोलिस हवालदार सोनवणे, पोलिस नाईक कांबळे, पोका वर्पे यांचे पथकाने संगमनेर येथे दोन दिवस थांबुन  तपास करून गुन्हयाची उकल केली.

सदर गुन्हयातील आरोपी १) समीर ज्ञानेश्वर सोनवणे वय २१, २) अक्षय पुंजा सोनवणे वय २७ वर्षे, ३) प्रदिप सुनिल नवाळे वय २२ वर्षे, ४) सुरेश दादु गायकवाड वय ३२ वर्षे ( सर्व रा. संगमनेर, जि. अहमदनगर ) यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता गुन्ह्यात वापरलेली वेणु कार चालक सुरेश गायकवाड यांने वरील आरोपी क्र १ ते ३ यांचेशी संगनमत करून सदर गुन्हयाचा अतिषय नियाजनबध्द कट रचुन गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयात वरील चारही आरोपींना अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन गुन्हयात चोरी केलेले रोख रक्कम ११,००,०००/- रू. सह गुन्हा करण्यासाठी वापरलेली शाईन मोटार सायकल (नं. एम एच १७ ई सी ८५६५) हि जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ- १  मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोसई विजय जगदाळे, स.फौ. सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, झनकर, पोना हनुमंत कांबळे, मनोज साबळे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, विलास कांदे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर बामने हे करीत आहेत.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!