चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे, खड्डे न बुजविल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा..
चाकण-तळेगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे, खड्डे न बुजविल्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा..
महाबुलेटीन न्यूज
चाकण : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनचं रस्ते खड्डेमय झाल्याचे चित्र चाकणच्या तळेगाव चौकात पहावयास मिळत आहेत, यामुळे रस्ते बनवणाऱ्या आय आर बी कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला दिसत असल्याचे शिवसेना चाकण उपशहरप्रमुख स्वप्निल बिरदवडे यांनी महाबुलेटीन न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पावसाळा सुरू होताच एकदा, दोनदा पडलेल्या पावसामुळे तळेगाव चौकातील युनिकेअर हॉस्पिटलसमोर, खराबवाडीत आनंतकृपा पतसंस्थेसमोर, सारा सिटी कमानी समोर, म्हाळुंगे हद्दीत ब्लॅक अँड डेकर, पादुका चौक, बजाज इलेक्ट्रिकल्स समोर इतके खड्डे झाले आहेत की, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे समजत नसल्याने अनेक दुचाकी चालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे, तसेच खड्ड्यांमुळे वाहतुकीचाही खोळंबा होत असल्याने यापुढील काळात अजून अपघात होऊ नयेत, यासाठी लवकरात लवकर ते खड्डे बुजविण्यात यावेत, नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना चाकण शहर आणि आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, महेश शेवकरी, धिरज केळकर, अतुल गोरे, रत्नेश शेवकरी, विशाल बारवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.