चाकण पोलिसांचा अवैध हातभट्टीवर छापा, धडक कारवाई ९७ हजाराचा ऐवज नष्ट, पती-पत्नीवर गुन्हा दाखल…
चाकण पोलिसांचा अवैध हातभट्टीवर छापा, धडक कारवाई ९७ हजाराचा ऐवज नष्ट, पती-पत्नीवर गुन्हा दाखल…
महाबुलेटीन न्यूज
चाकण : काळुस गावच्या हद्दीत भामा नदीच्या कडेला दाट झाडाझुडपात असलेल्या एका गावठी अवैध हातभट्टीवर चाकण पोलिसांनी धडक कारवाई करून ९७ हजार ६५० रुपयांची दारू नष्ट करून उर्वरित मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई २८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास केली. पोलिसांनी छापा टाकताच दारू गाळणारा इसम टेकडीवरून उडी मारून नदीच्या पाण्यातून पळून गेला. यावेळी त्याची पत्नीने ही हातभट्टी आम्हीच चालवीत असल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य २००० लिटर मापाचा भोपळा बॅरल, थाळी, ३५ लिटर मापाचे कँड, २०० लिटर जळके रसायन असा सुमारे ९७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
याप्रकरणी उत्तरसिंग रामकुमार राठोड ( वय ४५ ), व त्याची पत्नी मंजिला ( वय ३९०, दोघेही रा. तुकाईवस्ती, काळुस, भोसे, ता. खेड, जि. पुणे ) यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त परिमंडळ १ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, सहाय्यक फौजदार दत्ता जाधव, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, पोलीस नाईक संदीप सोनवणे, मच्छिन्द्र भांबुरे, विलास कांदे, निखिल वरपे, मनोज साबळे यांच्या पथकाने केली.
—-