महाबुलेटीन न्यूज : चाकण नगरपरिषद पाणी पुरवठा योजना स्थगित व रद्द करून नवीन योजना प्रस्ताव करण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
महाबुलेटीन न्यूज
चाकण : चाकण नगरपरिषद पाणी पुरवठा योजना स्थगित व रद्द करून नवीन योजना प्रस्ताव करण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर देण्यात आले आहे.
चाकण नगरपरिषद पाणी पुरवठा योजना प्रस्ताव सदोष असून रेरा कायदा भंग करून विकसकांच्या जागेत पाण्याच्या टाक्या घेणे, तसेच कातकरी वस्तीत जलशुध्दीकरण केंद्र यासह विना अधिकार 64 लाख रूपये तांत्रिक शुल्क 14 व्या वित्त आयोगातुन भरणे, असे प्रकार पाणी पुरवठा योजनेत करण्यात आले असून जागा ताब्यात नाहीत. तथापि राज्य शासनाने सदोष प्रस्ताव मंजूर केल्याचे समजले, परंतु चाकण नगरपरिषद हद्दवाढ अनुषंगाने व जनगणना 2021 चे अचूक आकडेवारी घेऊन एकात्मिक पाणी पुरवठा योजना करणे आवश्यक आहे. कारण पाणी पुरवठा योजना करताना पुढील 50 वर्षाचा विचार व नियोजन करण्यात येते, सबब घाईघाईत फक्त श्रेयासाठी निर्णय घेऊन याभागाचे नुकसान होऊ नये. सद्याचे खासदार व आमदार यांचा विचार व मत घेण्यात यावे. काही लोक फक्त प्रसिध्दीसाठी काम करत आहेत, आज चाकण नगरपरिषद हद्दवाढ अंतिम टप्यात असून भामा आसखेड धरणातुन वाढीव पाणी आरक्षण करून खेड तालुक्यातील चाकण नगरपरिषद हद्दवाढीतील 16 गावांचा देखील पुढील 50 वर्षाचा पाणी प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. यासाठी अंदाजे 150 कोटीचा अंदाजपत्रकीय खर्च अपेक्षित असून सद्याची 64 कोटीची योजना 71 हजार लोकसंख्येसाठी असून हद्दवाढ निकषावर 1.5 लाख लोकसंख्येसाठी पाणी रोज उपलब्ध होणार आहे.
वर्षभरात जनगणना 2021 निकष येतील तसेच 3 महिन्यात नगरपरिषद हद्दवाढ मा. उच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार होणार आहे, त्यामुळे घाई गडबड न करता एकात्मिक योजना व्हावी, सद्यस्थितीत एम जी पी पाणी पुरवठा योजनेतून चाकण नगरपरिषद आरक्षण पाणी उचलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिंचवड येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्फत सविस्तर वस्तुस्थिती दर्शक निवेदन दिले असून खेड तालुक्यातील गावांना एकात्मिक पाणी पुरवठा योजना अंतर्गत पाणी भेटलेच पाहिजे, यासाठी शासन दरबारी प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन शहराध्यक्ष आनंद गायकवाड, राम गोरे, जमीरभाई काझी, अशोक बिरदवडे, मुबीन काझी, व्यंकटेश सोरटे यांना आमदारांनी दिले.
काही लोक कामांचे श्रेय मंत्री महोदय यांचे बरोबर फोटो काढून घेत असून त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी करायचं तर अजितदादा पवार यांचेसारखे एक नंबर काम करा आणि श्रेयापेक्षा शाश्वत कामे करण्यासाठी प्रयत्न व्हावा, सरकार महाविकास आघाडीचे आहे याचे देखील स्मरण ठेवावे.
– आनंद गायकवाड अध्यक्ष चाकण शहर काँग्रेस