चाकण येथे गुन्ह्यातील आरोपीला दोन पिस्तूलासह अटक
महाबुलेटिन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : चाकण एमआयडीसीतील निघोजे गावच्या हद्दीतील महिंद्रा कंपनीसमोर एका गुन्ह्यातील फरार आरोपीस चाकण पोलिसांनी दोन पिस्तूल व चार जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्ञेश संजय नेटके ( वय ३३, रा. फ्लॅट नं. ३, पहिला मजला, जयवंत अपार्टमेंट, गावडे भोईर आळी, चिंचवडगाव, मुळगाव वाठार येळूशी, ता. कोरेगाव, जि. सातारा ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नेटके हा महिंद्रा कंपनीकडून तळवडे रोडवर घातक शस्रांसह येणार असल्याची गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस नाईक जयवंत राऊत यांना कळाली असता तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने त्याला सापळा लावून पकडले. सदर गुन्हा महाळुंगे पोलीस चौकीकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार हे पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस कर्मचारी संपत निकम, हवालदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, प्रमोद वेताळ, दीपक खरात, वसंत खोमणे, महिला पोलीस हवालदार, उषा दळे, विपुल जाधव, चेतन मुंढे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, आतिष कुडके, नामदेव राऊत यांच्या पथकाने केली.