Sunday, August 31, 2025
Latest:
उद्योग विश्वकामगार संघटनाखेडपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेषसण-उत्सव

चाकण औदयोगिक वसाहतीमध्ये कामगारांना सर्वाधिक बोनस…दिवाळी पूर्वीच कामगारांची दिवाळी साजरी…

 

कोरोनाग्रस्त कामगारांना व संपर्कातील कामगारांना पगारी सुट्ट्या शिवाय भरघोस बोनस म्हणजे दुग्धग्धध-शर्करा योगच – कामगार नेते जीवन येळवंडे

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण एमआयडीसी : चाकण औद्योगिक वसाहती मधील म्हाळुंगे इंगळे येथील केहीनफाय प्रा. लि. या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये कामगारांना ३३०००/- रुपये बोनस देण्यात आला, त्यामुळे कामगारांमध्ये लॉकडाऊन नंतर प्रथमच आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्त कामगारांना व त्यांच्या संपर्कातील कामगारांना पगारी सुट्ट्या शिवाय दिवाळी पूर्वी भरघोस बोनस म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे, असे प्रतिपादन कामगार नेते जीवन येळवंडे यांनी केले.

आज बुधवार दिनांक २८/१०/२०२० रोजी व्यवस्थापन व केहीन फाय एम्प्लॉईज युनियन यांच्या मध्ये बोनस संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकी मध्ये सन २०१९ व २०२० या वर्षासाठीचा बोनस म्हणून ३३०००/- रुपये बोनस वर एकमत झाले.

गेल्या मार्च महिन्या पासून कोरोनाच्या अतिशय कठीण परिस्थिती मध्ये सर्व कामगार व कामगार संघटनेने घेतलेल्या सहकार्याचा भूमिकेमुळे कंपनीची लाईन बंद होऊन दिली नाही. त्याची भेट म्हणून सर्व कामगारांना भरघोस बोनस देण्यात आला. त्यामुळे दिवाळीच्या आधीच कामगारांनी दिवाळी साजरी केली.

या अगोदर मार्च ते मे महिन्या पर्यंत सर्व कामगारांना पूर्ण पगार देण्यात आला. कंपनीच्या वतीने कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या कामगारांना २८ दिवसाची पगारी सुट्टी देण्यात येते. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कामगारांना १४ दिवस होम कॉरंटाईन करून पगार दिला जातो. या सर्व चांगल्या गोष्टीमध्ये झालेली बोनस वाढ ही दुधात साखर पडल्या सारखे आहे, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले.

व्यवस्थापनाच्या वतीने प्लॅन्ट हेड श्रीकांत मापारी, वरीष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापक बाजीराव गाजी, व्यवस्थापक संपत फडतरे, प्रशांत ननावरे व संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस सतीश पाटील, सचिव नरेश भोयर, उपाध्यक्ष रवींद्र महाजन, खजिनदार विकास कासुर्डे, दत्तात्रय गायकवाड, प्रदीप बोरुडे, शंकर गडदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!