BIG BREAKING : खराबवाडी गावातील वाघजाईनगर मधील कंपनीत कॉईल व पिलरच्या खाली दबून कामगारांचा दुर्दैवी मृत्यू…!
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी गावातील वाघजाईनगर परिसरातील अनव इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीत राम सुंदर (वय २३ वर्षे, मूळ रा. मध्यप्रदेश ) याचा कॉईल व लोखंडी पिलरच्या खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या अगोदरही याच कंपनीत मागील पाच महिन्यापूर्वीही असाच एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचं कंपनीत पुन्हा अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जर अशा कंपन्या कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेत नसतील आणि असे कामगारांचे दुर्दैवी मृत्यू होत असतील तर अशा कंपन्याची सखोल चौकशी करून कंपन्यावर कारवाई करायला हवी अशी मागणी होत आहे.
राम सुंदर नामक कर्मचारी हा मागील चार दिवसापुर्वीच या कंपनीत कामावर रुजू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. कामगारांच्या बाबत असा हलगर्जीपणा कंपन्या करत असतील तर असे परप्रांतीय कामगारांच्या जीवाची किंमत आहे की नाही असाही प्रश्न निर्माण होत आहे.