Thursday, April 17, 2025
Latest:
निवडणूकपुणे जिल्हाभोरमीडियाविशेष

भोर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडणूक बिनविरोध.. अध्यक्षपदी वैभव भूतकर, उपाध्यक्षपदी माणिक पवार व संतोष  म्हस्के, तर सरचिटणीसपदी स्वप्नीलकुमार पैलवान यांची निवड

भोर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी निवडणूक बिनविरोध.. अध्यक्षपदी वैभव भूतकर,  उपाध्यक्षपदी माणिक पवार व संतोष म्हस्के, तर सरचिटणीसपदी स्वप्नीलकुमार पैलवान यांची निवड

महाबुलेटीन न्यूज । विशेष प्रतिनिधी
भोर : पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्नित भोर तालुका पत्रकार संघाची आज ( दि. ४ जुलै ) द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. लोकमतचे वार्ताहर वैभव भूतकर, उपाध्यक्षपदी दै. सामनाचे वार्ताहर माणिक पवार व दै. पुण्यनगरीचे वार्ताहर संतोष म्हस्के, तर सरचिटणीस पदी स्वप्नीलकुमार पैलवान यांची निवड करण्यात आली.

४ जुलै २०२१ ते ३ जुलै २०२३ या दोन वर्षाच्या मुदतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या नऊ जागांसाठी प्रत्येकी एक असे नऊच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल जगताप यांनी जाहीर केले. यावेळी एम. जी. शेलार यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे :- अध्यक्ष वैभव नरहरी भूतकर, उपाध्यक्ष संतोष भगवान म्हस्के व माणिक बाबासो पवार, सरचिटणीस (सचिव) स्वप्निलकुमार पैलवान, कोषाध्यक्ष (खजिनदार) किरण काळूराम दिघे, तर कार्यकारिणी सदस्यपदी सूर्यकांत पांडुरंग किंद्रे, नितीन वसंत धारणे, चंद्रकांत सिताराम जाधव व किरण महादेवराव भदे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच तालुका समन्वयक म्हणून दत्तात्रय दिनकर बांदल यांची निवड करण्यात आली. 

नवीन कार्यकारिणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर, निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा समन्वयक सुनिल जगताप व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा परिषद प्रतिनिधी एम. जी. शेलार यांनी अभिनंदन केले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!