भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावागावामध्ये साखर वाटप
महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
घोडेगाव : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर साखर कारखान्यामार्फत सभासद व ऊस उत्पादकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे दिपावली निमित्त महाराष्ट्र राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार मा. संचालक मंडळ सभेत झालेल्या निर्णयानुसार गट व गाववार साखर वाटपाचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवार दि. १२/१०/२०२० ते शनिवार दि. २४/१०/२०२० या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रोखीने रु. २०/- प्रति किलो या दराने गावागावामध्ये साखर वाटप करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
सभासदांना सन २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षासाठी साखर कार्ड वाटप करण्यात आलेले असून सन २०१९-२० गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांसाठी साखर कार्ड वाटपाचे काम संबंधित विभागीय शेतकी गट ऑफीसला चालू आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला सभासद व ऊस उत्पादकांनी त्यांना दिलेले साखर कार्ड व ओळखीचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व सन २०१९-२० गाळप हंगामात ऊस पुरविलेला आहे.
यांचेसाठी (१) पुर्ण भागधारक (शेअर्स रक्कम रु. १०,०००/-) व ऊस उत्पादक – ८० किलो (२) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक – ६० किलो (३) अपुर्ण भागधारक व ऊस नाही – ५० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावागावामध्ये व गटामध्ये १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.
सोमवार दि. १२- पारगाव गटातील गावे, मंगळवार दि. १३ – निरगुडसर गटातील गावे, बुधवार दि. १४ – कळंब गटातील गावे, गुरुवार दि. १५ – रांजणी गटातील गावे, शुक्रवार दि. १६ – घोडेगाव गटातील गावे, शनिवार दि. १७ – करंदी गटातील गावे, रविवार दि. १८ – जातेगाव गटातील गावे, सोमवार दि. १९ – जांबूत गटातील गावे, मंगळवार दि.२० – मंचर गटातील गावे, बुधवार दि. २१- कवठे गटातील गावे, गुरुवार दि. २२ – टाकळी हाजी गटातील गावे, खेड, शेल पिंपळगाव, निघोज, जवळा गट ऑफीसला, शुक्रवार व शनिवार दि. २३ व २४ – भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गट ऑफीसला पारगाव, निरगुडसर, मंचर, घोडेगाव, टाकळी हाजी, करंदी व जातेगाव गावांसाठी साखर वाटप नियोजित तारखेपासून सलग ३ दिवस राहील. कळंब, महाळुंगे पडवळ, अवसरी बु., अवसरी खुर्द, जारकरवाडी, शिंगवे, काठापूर बु., चांडोली बु., जवळे, गावडेवाडी, खडकी, पिंपळगाव, रांजणी, वळती, चास, जांबूत, पिंपरखेड, कवठे गावांसाठी साखर वाटप नियोजित तारखेपासून सलग २ दिवस राहील याची सर्व सभासद व ऊस उत्पादक यांनी नोंद घ्यावी.
जे सभासद / ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवून शकणार नाहीत, त्यांना आपली साखर सोमवार दि. २६ ते शनिवार दि. ३१/१०/२०२० या कालावधीमध्ये आठवडा सुट्टी दि. २९/१०/२०२० वगळून इतर दिवशी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दिली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या व्यक्तींसाठी मार्च २०२१ पर्यंत प्रत्येक महिन्याचे पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे.
गर्दी कमी करण्यासाठी गावागावांमध्ये साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेवून सलग २ व ३ दिवस वाटपाचे नियोजन केले आहे. तरी वरील नमुद तारखेला सभासद व ऊस उत्पादक बांधवांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क व सोशल डिस्टंसिंगचा वापर करून साखर घेवून जाण्याबाबतचे आवाहन कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बाळासाहेब बेंडे यांनी केले.