भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
महाबुलेटीन न्यूज
चाकण : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ७ वर्ष पुर्ण होताना हा वर्धापनदिन सेवा कार्यानी संबंध देशात साजरा होत असताना कोरोनाच्या संकटाचं गांभीर्य पाहता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा व खेड तालुका यांच्या सयुंक्त विद्यमानाने चाकण नगरपरिषद हद्दीतील कचरागाडीद्वारे चाकण शहर व परिसर स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील, भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे पाटील व भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
चाकण नगरपरिषद मधील शिल्पा शिंदे, मुकुंद कांबळे, अजय मंजुळे, गोपी सुतार, दत्ता गायकवाड, अंकुश होले, वैभव शिंदे, केतन माने आदी कर्मचा-यांचा सन्मान भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, खेड तालुका संघटन सरचिटणीस ॲड. प्रितम शिंदे, युवा मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस शाम पुसदकर व भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्षा मालिनी शिंदे यांच्या शुभहस्ते शॉल, सॕनिटाईजर व हॕन्डवॉश देऊन करण्यात आला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा चाकण शहर कार्याध्यक्ष प्रशांत शेवकरी, कामगार आघाडीचे संतोष हजारे, अंकुश पांडे, नागेश गवळी, गोविंद ठाकरे, मोहन पुसदकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव व भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस शाम पुसदकर यांनी केले.
०००००