भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी संदेश जाधव यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी संदेश जाधव यांची नियुक्ती
महाबुलेटीन न्यूज
चाकण एमआयडीसी : श्री क्षेत्र महाळुंगे येथील युवा कार्यकर्ते व क्षत्रियकुलावतंस प्रतिष्ठाण खेड तालुक्याचे संस्थापक-अध्यक्ष संदेश राजन जाधव यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. वाघोली येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांना नियुक्तीचे पत्र कणकवली विधासभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते व भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी माजी आमदार बाबुराव पाचर्णे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रविण काळभोर, दादासाहेब सातव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदिप सातव, सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे, जीवन साखरे, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंडीत भुजबळ, गणेश कुटे, काळुराम पिंजण, जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे, जिल्हा सचिव श्याम पुसदकर, शहराध्यक्ष प्रतिक गंभीर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शेवकरी, तालुका उपाध्यक्ष नसीम पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यापूर्वी त्यांनी विद्यार्थी आघाडी जिल्हा संघटन सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हा संपर्कप्रमुख अशा विविध पदांवर कामे केले आहे. म्हणूनच त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य कुटुंबातील युवकाला जिल्ह्याच्या पदावर संधी दिल्याबद्दल युवा वर्गातून स्वागत होत आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘गाव तिथे शाखा’ करून जिल्ह्यात युवकांचे संघटन करणार असल्याचे त्यांनी नियुक्ती नंतर बोलताना सांगितले.
———-