कार्तिकी यात्रेनिमित्त भंडारा डोंगरावरील मंदिरे तीन दिवस बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टचा निर्णय
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुखमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावरील मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत.
पंढरपूर ची कार्तिकी यात्रा २६ नोव्हेंबरला असून शासनाच्या १६ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २५ ते २७ नोव्हेंबर २०२० दरम्यान मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला आहे.