भामा इंग्लिश मिडीयम स्कुलचा दहावीचा निकाल 100 टक्के,सुमित गंगारडे प्रथम
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठाण संचालित, भामा इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100% लागला असून सुमित गंगारडे या विद्यार्थ्याने 84 टक्के मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक – गंगारडे सुमित परशुराम 84.00%
द्वितीय क्रमांक – सिकिलकर फाराण राजू 82.80%
तृतीय क्रमांक – भोगती दर्शन सुरेश 80.40%
चौथा क्रमांक – गोरे राजवर्धन माणिक 79.20%
पाचवा क्रमांक – वाळुंज निर्भय विठ्ठल 69.20%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, सचिव प्रमिला गोरे, सर्व संचालक मंडळ, पालक यांनी अभिनंदन करून पुढील करियर साठी शुभेच्छा दिल्या.