बजाज ऑटो कडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयास व्हेंटिलेटर प्रदान
बजाज ऑटो कडून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयास व्हेंटिलेटर प्रदान
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण : एमआयडीसीतील बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीच्या जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने सीएसआर फंडातून कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सात लाख रुपये किंमतीचे व्हेंटिलेटर प्रदान केले आहे.
बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव, वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास झांजरी, चाकण प्लांट हेड नवीन निझवान
यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी बजाज ऑटो सपोर्ट सर्व्हिस इंचार्ज अमित गंभीर, प्रशासन व्यवस्थापक अनिल गुढेकर, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था ( JBGVS ) टीम, खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे, चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक एन. जी. ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.