Saturday, August 30, 2025
Latest:
खेडगुन्हेगारीपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाविशेष

अतिप्रसंगास विरोध केल्याने ७१ वर्षाच्या जेष्ठ महिलेचा खून, मयत झाल्यावरही नराधमाने केला अतिप्रसंग, ● आरोपीस अटक, श्वान पथक आणि पोलिसांनी ५ तासात ठोकल्या आरोपीला बेड्या..

अतिप्रसंगास विरोध केल्याने ७१ वर्षाच्या जेष्ठ महिलेचा खून, मयत झाल्यावरही नराधमाने केला अतिप्रसंग,
● आरोपीस अटक, श्वान पथक आणि पोलिसांनी ५ तासात ठोकल्या आरोपीला बेड्या..

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : कुरकुंडी ( ता.खेड ) येथील एका ७१ वर्षीय वृद्ध महिलेने अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेच्या डोक्यावर व चेहऱ्यावर फुकणीने प्रहार करून निर्घृण खून केला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वृद्ध महिला मयत झाल्यानंतरही या नराधमाने अतिप्रसंग केला असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीला पाच तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी ( दि. २३ ) रोजी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास घडली असून काल दुपारी उघडकीस आली. सखुबाई बबन राऊत ( वय ७१ वर्षे, रा.कुरकुंडी, ता.खेड, जि.पुणे ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गावातील अनिल सुदाम वाघमारे ( वय ५२ वर्षे, रा.कुरकुंडी, ता.खेड, जि.पुणे ) या इसमास अटक करण्यात आली असून त्याने खुनाचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तत्पूर्वी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा छडा लावला होता, त्यानंतर ‘जॅक‘ नावाच्या श्वानानेही याच आरोपीचा माग काढला. याबाबत मयत महिलेची सून विमल शिवाजी राऊत ( वय ५० वर्षे ) यांनी फिर्याद दिली आहे. 

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी पाहणी करून बारकाईने तपास केला. श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाला पाचारण करून पोलीस पथके तयार करण्यात आली. अवघ्या पाच तासात या गुन्ह्याची उकल करण्यात आली.

आदल्या रात्री पाऊस पडला असतानाही श्वानाने आरोपीच्या घरापर्यंत अचूक माग काढला. श्वानाला फुकणीचा वास देताच त्याने आरोपीच्या घराकडे धूम ठोकली, आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

या महिलेच्या तीन मुलांपैकी एकजण मयत असून, एकजण कडूस व एकजण पुण्यात वास्तव्यास आहे, त्यामुळे महिला या ठिकाणी एकटीच राहत होती. आरोपीने खून केलेल्या खोलीत दारूची बाटली, आधारकार्ड व माळ आढळली आहे. म्हातारीचा मृतदेह विवस्त्र आढळल्याने स्वब घेऊन वैद्यकीय फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, या अहवालात मयत झाल्यानंतर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, विकास पंचमुख, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका साळुंखे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, दीपक हांडे, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, दत्ता बिराजदार, शशिकांत होले, किरण मांजरे, निखिल वरपे, प्रवीण राळे, नितीन गुंजाळ, अशोक दिवटे, सुप्रिया धुमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!