अटी, शर्ती विना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी देण्याची भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी
अटी, शर्ती विना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी देण्याची भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी
महाबुलेटीन न्यूज
राजगुरुनगर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकार कडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा व खेड तालुका यांच्या वतीने तीव्र निषेध करून कोणत्याही अटी, शर्ती विना छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे खेड तालुकाध्यक्ष काळुराम पिंजण, भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, राजगुरूनगर पोलीस स्टेशनचे पी. आय. जगताप, आळंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक सुरेखा सागर यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्हा व खेड तालुका पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा चाकण शहराध्यक्ष श्याम पुसदकर, राजगुरूनगर शहराध्यक्ष मयुर होले, शहर सरचिटणीस शुभम थोरात, शहर उपाध्यक्ष सिद्धेश सांडभोर, वैभव मलघे, दिपक जाधव, आळंदी शहराध्यक्ष आकाश जोशी, शहर सरचिटणीस सुजित काशिद, शहर उपाध्यक्ष आनंद वडगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.