आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांची कोरोनावर मात
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर येथे गटप्रर्वतक म्हणून कार्यरत असलेल्या गितल सतिश गावडे यांनी कोरोना आजारावर यशस्वीरित्या मात केली असून काही दिवसाच त्या पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार आहेत.
आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या गितल गावडे या कोरोना संकट काळात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाची नियमितपणे आरोग्य तपासणी करत होत्या. “माझे कुटुंब, माझे गाव” या मोहिमेअंर्तगत गावडे यांनी आरोग्य विषयक असलेल्या विविध शासकीय योजना राबवण्यासाठी मोठ्या धडाडीने व प्रामाणिकपणे काम केले. हे करतअसताना त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांनी आपल्या स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना झाल्याचे कळताच त्यांनी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. त्यांना कोरानाबाबत योग्य ती आरोग्य विषयक सेवा व्यवस्थित मिळावी यासाठी तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, बी. सी. एम. गणेश आमले, नाईकडे मँडम यांनी प्रयत्न केले त्यामुळेच गावडे या कोरोना मुक्त झाल्या असून त्या पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या नोकरीवर लवकर रुजू होणार आहेत.
“कोरोना झाल्यानंतर घाबरून न जाता त्यावर मात करावी. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गोळ्या वेळच्यावेळी औषधे घ्यावीत. कोरोना हा बरा होतो त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. शासनाने दिलेल्या नियम व अटीचें पालन करावे.”
— गितल गावडे, आशा गटप्रर्वतक, निरगुडसर.